आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

0
317

संसदेच्या आज सोमवार दि. १४ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असून दोन महिला खासदारांसह लोकसभेच्या ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक खासदारांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. लोकसभेचे कामकाज रोज ४ तास चालणार असून या कामकाजाच्या वेळी नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे. शून्य प्रहराचा कालावधीही अर्ध्या तासावर आणण्यात आलेला आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी दोन आसनामधील अंतरही वाढवण्यात आलेले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी सर्व सदस्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे सांगितले आहे. अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.