आजपासून मासेमारी बंदी

0
119

राज्यात आज १६ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात येत असून राज्यातील सर्व जेटींना व जेटीवरील डिझेल पंपांना सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती मच्छिमारी खात्याच्या संचालक डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी काल दिली. ही बंदी ३१ जुलैपर्यंत राहणार आहे.
दरवर्षी १ जून ते ३१ जुलै असे ६१ दिवस राज्यात मच्छिमारी बंदी लागू करण्यात येत असे. पश्‍चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांना ती बंदी लागू करण्यात येत असे मात्र, यंदा कोरोनामुळे एप्रिल महिन्यात मासेमारी बंद होती. त्यामुळे यंदा बंदीचा काळ १५ दिवसांनी पुढे ढकलला असतानाही बोटींवरील कामगार गावी गेल्याने या काळात मासेमारी होऊ शकली नाही, असे सूत्रानी सांगितले. ज्या काही ट्रॉलर्सवर कामगार होते ते ‘निसर्ग’ वादळामुळे मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ शकले नाहीत.