आगोंद येथून काणकोणला येत असताना एका धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात आगोंद येथील एक निवृत्त शिक्षक महाबळेश्वर फळदेसाई (७५) यांचे जागीच निधन झाले. त्यांचा मुलगा संकेत हा गंभीर जखमी झाला आहे. आपल्या कारने हे दोघे चावडीवर येत असताना आगोंद येथील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा गेल्याने हा अपघात झाला. यात महाबळेश्वर यांचे वाहनात चिरडल्यामुळे निधन झाले. अपघाताची खबर मिळताच काणकोण पोलीस पथक, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर संकेत यांना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.