आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावरील निर्बंधात ३१ जुलैपर्यंत वाढ

0
120

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील निर्बंधात येत्या ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने काल दिली. या निर्बंधांचा कालावधी आज दि. १ जुलैला संपणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ही मर्यादित स्वरुपात चालवण्यात येत आहे. वंदे भारत योजनेनुसार विमानांची उड्डाणे सुरू आहेत. पण देशांतर्गत विमानाच्या वाहतुकीवरील बहुतेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने काल काढलेल्या एका परिपत्रकानुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध हे ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.