केंद्राकडून खासगी इस्पितळांवर लस खरेदीसाठी मर्यादा निश्‍चित

0
111

खासगी इस्पितळांना थेट लस खरेदीची दिलेली सवलत मागे घेत महिन्याला लस खरेदीची मर्यादा निश्‍चित केली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेताना यासंदर्भात एक एसओपी जारी केली आहे. यानुसार १ जुलैपासून नवे नियम लागू होतील. एका आठवड्यात जेवढे लसीकरण झाले त्यानुसार त्याची रोजची सरासरी काढून लशींचे वितरण केले जाईल. जेवढी संख्या येईल त्याच्या दुप्पट डोस खासगी इस्पितळे खरेदी करू शकतील. तर जी इस्पितळे पहिल्यांदा लसीकरण करत असतील त्यांना खाटांच्या संख्येवर आधारीत लस वितरण केले जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.