महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर

0
60

>> वाहतूक मंत्र्यांची माहिती

येत्या २०१८-१९ पर्यंत राज्यातील सर्व महामार्गांवरून वाहतूक करीत असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल. ते झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करता येईल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले.
पणजी ते जुने गोवे पर्यंतच्या महामार्गावर दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी विशेष लेन ठेवली आहे. दुचाकी चालक त्याचा वापर करीत नसल्याचे दिसून आले आहे. काल आपण पणजीला येत असताना एका वाहन चालकाला अडवून वेगळ्या लेनचा वापर करण्याबाबत पटवून दिल्याचे ढवळीकर म्हणाले.
नव्या वाहतूक कायद्यात दंडात्मक रक्कम बर्‍याच प्रमाणात वाढविलेली असून राज्य सरकारलाही वरील रक्कम वाढविण्याचा अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वाढत्या रस्ता अपघातांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असून वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वाहतूकमंत्री म्हणाले.