‘अल्मा अँड ऑस्कर’ने होणार इफ्फीला प्रारंभ

0
16

२० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात होणार्‍या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ ‘अल्मा अँड ऑस्कर’ ह्या ऑस्ट्रिएन चित्रपटाने होणार आहे. व्हिएनीजमधील एक प्रतिष्ठित महिला अल्मा महलर (१८७९-१९८०) यांच्यातील उत्कट व तरल नातेसंबंधांवर आधारित असलेला हा एक चरित्रपट आहे. डायटर बर्नर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून, चित्रपटाची लांबी ११० मिनिटे एवढी आहे.

ऑस्कर कोकोस्का ही एक उद्योन्मुख चित्रकार आहे. तिचा पहिला नवरा गुस्ताव महलर याच्या मृत्यूनंतर वास्तुविशरद वॉल्टर ग्रापियस याच्याशी तिचे संबंध सुरू असताना ती अल्मा महलर या संगीत संयोजकाच्या संपर्कात येते. अल्मा ही ऑस्कर कोकोस्काबरोबर एक ज्वलंत प्रेमसंबंध सुरू करतेॉ हा चित्रपट त्यांच्या नात्याचा वेध घेतो.

‘अल्मा अँड ऑस्कर’ हा उद्घाटनाचा चित्रपट दि. २० नोव्हेंबर रोजी पणजीतील आयनॉक्समध्ये होणार आहे. तसेच इफ्फीत पहिल्यांदाच भयपट विभाग सुरू करण्यात आला असून, यंदाच्या इफ्फीपासून सुरू होणार्‍या या भयपट विभागाचे नामकरण ‘मकाब्र विभाग’ असे करण्यात आले आहे.