अमेय अवदीने जिंकली हंगेरीतील बुद्धिबळ स्पर्धा

0
131

>> पहिला आंतरराष्ट्रीय मानक प्राप्त

जीनो फार्मास्युटिकल्सचा ब्रँड ऍम्बासडर अमेय अवदीने हंगेरी येथी झालेल्या ४१व्या हरकणी टेंकेस चषक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या विजयाबरोबरच अमेयने पहिला आंतरराष्ट्रीय मानक पटकाविला. ग्रँडमास्टर अनुराग म्हामलनंतर तो गोमंतकीय बुद्धिबळात रँकिंगमध्ये द्वितीय क्रमावर पोहोचला आहे. अमेयचे २४२८ रेटिंग गुण झाले आहेत.

अमेयने हंगेरीतील ही स्पर्धा जिंकताना ७ विजय व २ बरोबरींसह ९ फेर्‍यांमधून ८ गुण प्राप्त केले. त्याने ग्रँडमास्टर फारागो इवान (हंगेरी), इंटरनॅशनल मास्टर केर्नाझित्स्की लीओनिड (रशिया), वुमन इंटरनॅशनल मास्टर नातालिया करेवा (रशिया) आणि पासझ्तोर फेरेंक (हंगेरी) यांच्यावर मात केली.
कोणतीही स्पर्धा जिंकणे हे चांगलेच असते, परंतु आंरराष्ट्रीय जेतेपद हे विशेष असते. मी माझा पहिला आंतरराष्ट्रीय मानक मिळविला असल्याने हा माझ्यासाठी एक चांगला क्षण आहे, असे अमेय म्हणाला, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश काब्राल यांनीही अमेयचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.