>> पंजाब पोलिसांना मिळाले प्राथमिक पुरावे
‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालचे आयएसआयशी संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे पंजाब पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर केंद्राला सतर्क करण्यात आले आहे. अमृतपालला परदेशातून निधी आल्याचाही संशय आहे. जालंधर रेंजचे डीआयजी स्वपन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे. अमृतपालने आनंदपूर खालसा फोर्स तयार करण्याची तयारी केली होती. त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर एकेएफ अशी अक्षरे लिहिली असल्याचे पुरावे सापडले आहेत. पंजाबमध्ये आज 20 मार्चपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. पंजाबमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता इंटरनेट बंदी आणखी वाढवण्यात आली आहे.