Home बातम्या अमित पाटकर स्वीकारणार आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

अमित पाटकर स्वीकारणार आज प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

0

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष अमित पाटकर हे आज सोमवार दि. ११ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. मावळते अध्यक्ष गिरीश चोडणकर हे त्यांना पदभार देतील. अमित पाटकर यांच्याबरोबरच गोवा प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष युरी आलेमाव, जिल्हा अध्यक्ष वीरेन शिरोडकर व सावियो डिसिल्वा हेही यावेळी पदभार स्वीकारतील. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिंदबरम्, पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव तसेच दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो आदी नेते यावेळी हजर असतील.