अफगाणिस्तानला वर्ल्डकप २०१९चे तिकिट

0
79

>> आयर्लंडवर ५ गड्यांनी मात

फिरकीपटू रशिद खानच्या शानदार गोलंदाजीनंतर सलामीवीर मोहम्मद शहजादने अर्धशतकी खेळीसह गुलबदिन नैबच्या साथीत पहिल्या विकेटसाठी केलेल्या ८६ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने आयसीसी विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या ङ्गसुपर सिक्सफ फेरीत आयर्लंडवर ५ गड्यांनी मात करीत २०१८ विश्वचषक स्पर्धेसाठी आपले तिकिट निश्‍चित केले.

२०१९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता मिळविणारा आयर्लंड हा दहावा संघ ठरला. जागतिक क्रमवारीतील प्रथम आठ संघांना विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळला होता. तर झिम्बाब्वेत खेळविण्यात आलेल्या या विश्वचषक पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडीजने यूएईवर मात करीत आपली पात्रता सिद्ध केली होती. त्यामुळे आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील विजेता संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार होता. त्यात अफगाणिस्तानने बाजी मारली.

काल हरारेत खेळविण्यात आलेल्या सामन्यात आयर्लंडला ७ बाद २०९ धावांवर रोखल्यानंतर अफगाणिस्तानने विजयी लक्ष्य ४९.१ षट्‌कांत गाठले. सलामीवीर मोहम्मद शहजाद व गुलबदिन नैब यांनी अफगाणला ठोस प्रारंभ करून देताना पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. ६ चौकार व २ षट्‌कारांच्या सहाय्याने ५० चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केलेला शहजाद सिमी सिंगच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रँकिनकडे झेल देऊन बाद झाला. रहमत शाह जास्तवेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही व १२ धावा जोडून परतला. ३ चौकारांनिशी ४५ धावांची संयमी खेळी केलेला गुलबदिन रँकिंनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मोहम्मद नबीही १२ धावांचे योगदान देऊन परतल्याने अफगाणिस्तान काहीसा बॅकफूटवर गेला होता. समिउल्ला शेनिवारीने उपयुक्त २७ धावा जोडून मॅक्‌कार्थीजचा बळी ठरला. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार असघर स्टॅनिक्झायने नजिबुल्लाह झद्रानच्या साथीत आणखी गडी बाद न होऊ देता अफगाणिस्तानला पुढील वर्षी होणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीची पात्रता मिळवून दिली. कर्णधार असघरने ४ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने २९ चेंडूत नाबाद ३९ तर झद्रानने नाबाद १७ धावा जोडल्या. आयर्लंडतर्फे सिमी सिंगने ३ तर बेरी मॅक्‌कार्थी व बॉयड रँकिनने प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाला ७ गडी गमावत २०९ अशी धावसंख्या उभारता आली होती. त्यांच्या पॉल स्टिर्लिंगने सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. केविन ओब्रायनने ४१, निल ओब्रायनने ३६, विलियम्स पिटरफोल्डने २०, सिमी सिंगने १५ तर अँडी बालबिर्नी, गॅरी विल्सन व अँडी मॅक्‌ब्रायन यांनी प्रत्येकी ११ धावा जोडल्या होत्या. अफगाणिस्तानतर्फे रशिद खानने ४० धावांत ३ तर दावलत झद्रानने २ व मोहम्मद नाबीने १ गडी बाद केला.