अपघातात दुचाकीस्वार ठार

0
85

धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या अपघतात सावंतवाडी येथील ज्युलिअर डिसोझा हा इसम ठार झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिसोझा याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्युलिआर डिसोझ हा दुचाक वाहनाने पत्नी व मुलासोबत सावंतवाडीहून म्हापस बाजाराला आला होता. तेथे खरेदीचे सामान जास्त झाल्याने त्याची पत्नी व मुलगा बसने सावंतवाडीला गेली. ज्युलिआर हा मागून दुचाकीने सावंतवाडीला निघाला. धारगळ येथे तो लघुशंकेसाठी वाहन पार्क करून बाजूला गेला असता अज्ञात वाहनाने त्याला ठोकरले. दरम्यान ज्युलिआर यांच्या पत्नीने पती घरी न पोचल्याने शेजार्‍याला पाठविले असता धारगळ येथे त्यांना ज्युलिआर मृतावस्थेत आढळले. मृतदेह बांबोळी गोमेकॉ शवागारात पाठविण्यात आला आहे.