दिल्लीचे अपक्ष आमदार रणबीर शौकीन यांनी आम आदमी पार्टीच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणार असल्याचे सांगितले. सरकारने वीज व पाण्याच्या प्रश्नांकडे आवश्यक ते लक्ष दिले नसल्याने हे पाऊल उचलणार असल्याचे ते म्हणाले.
शैकीन, जनता दल – सं.चे शोएब इक्बाल, व आपचे हकालपट्टी केलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी २ फेब्रुवारी रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली होती.