अनुष्का – विराटला कन्यारत्नाची प्राप्ती

0
140

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांना काल कन्यारत्न प्राप्त झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात अनुष्काची प्रसूती झाली. काल सकाळीच तिला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अनुष्का गरोदर असल्याचे या दांपत्याने ऑगस्टमध्ये जाहीर केले होते.
कन्यारत्न प्राप्त होताच विराटने ट्वीटरवरून ही आनंदवार्ता आपल्या व अनुष्काच्या चाहत्यांना दिली. आमच्या जीवनाचा नवा अध्याय आता सुरू होत असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.