अंजुणे, आमठाणे धरणे भरली

0
100
पूर्ण भरल्याने अंजुणे धरणाचे चार दरवाजे खुले करण्यात आले., आमठाणे धरणही पूर्ण भरलेले आहे. (छाया : विशांत वझे)

अंजुणेचे अतिरिक्त पाणी सोडण्यास सुरूवात
अंजुणे धरणाबरोबरच आमठाणे धरणही पूर्ण क्षमतेपर्यंत भरलेले असून अंजुणे धरणाचे चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे तर आमठाणे धरणाच्या विअरमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालपर्यंत या भागात ३५९६ मिली पावसाची नोंद झाली आहे.
सुरवातीला पावसाने सुमारे २२ दिवसांची विश्रांती घेतल्याने पावसाच्या सरासरीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांत पावसाने आपली सरासरी भरून काढताना मुसळधार अवतार धारण करत समाधानकारक आकडा गाठला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी अंजुणे धरणाच्या पाण्याची पातळी ९२.४१ होती व पावसाची नोंद झाली होती. आमठाणे धरणाची पातळी पूर्णपणे भरलेली आहे व विअरमधून अतिरिकनत पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशी माहिती अभियंता पी. व्ही. श्रीकुमार यानी दिली. अंजुणे धरण अभियंते ज्ञानेश्‍वर सालेलकर यांनी यंदा पावसाने सरासरी गाठल्याचे सांगून धरणाची पातळी भरण्याच्या क्षमतेपर्यंत आलेली आहे. पावसाने आपली सरासरी राखल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता उद्भवणार नाही अशी स्थिती आहे.