अपघातानंतर कार मांडवीत : तिघे जखमी

0
108
रायबंदर येथे अपघातग्रस्त होऊन मांडवी नदीत कलंडलेली कार (छाया : शेख जमालुद्दीन)

रायबंदर पणजी मार्गावर काल दुपारी वॅगनर व आयटेन या वाहनांना झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले असून पैकी दोघांना बांबोळी इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर काशियानो डायस या महिलेवर उपचार चालू आहेत.
काशियानो व मारीयो डायस हे जोडपे कार घेऊन पणजीच्या दिशेने येत होते. ट्विंकल लोहाणे ही युवती पणजीहून रायबंदरच्या दिशेने जात होती.
अपघातानंतर वॅगनर कार बाजूच्या पाण्यातील झुडपात पडली. तेथील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना इस्पितळात दाखल केले.