मोरजी समुद्रकिनार्यावरील शॅक्स रात्री ८ वाजताच पोलीस बंद करीत असल्याने संतप्त बनलेल्या तेथील शॅक्सवाल्यांनी काल दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन रात्री ११ वाजेपर्यंत शॅक्स खुले ठेवण्यास मान्यता देण्याची जोरदार मागणी केली. त्यांच्याबरोबर पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे होते.
मोरजी किनारी हे कासवांचे पैदास केंद्र असल्याने शॅक्स आठ वाजता बंद करण्याची पोलीस सक्ती करीत आहेत. या प्रकारामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे शॅक्सवाल्यांचे म्हणणे आहे.