Home बातम्या १ नोव्हेंबरपासून बस प्रवास महागणार

१ नोव्हेंबरपासून बस प्रवास महागणार

0

खरे म्हणजे ही दरवाढ दोन महिन्यांपूर्वीच होणार होती. मात्र, खात्याने देऊ केलेली १० टक्के तिकीट दरवाढ बसमालकांनी नाकारल्याने दरवाढ लागू होऊ शकली नव्हती. नंतर खासगी बसवाल्यांनी वाहतूक खात्याशी संपर्क साधून १५ टक्के एवढी तिकिटदरवाढ देण्याची पुन्हा मागणी केली होती.

१० टक्के तिकिटदरवाढ दिल्यास ६ ते ८ कि. मी. पर्यंतच्या मार्गांवरील बसेसना काहीही फायदा होत नसल्याचे खासगी बसवाल्यांचे म्हणणे होते. अभ्यास केला असता त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्याने खात्याने १५ टक्के एवढी तिकिटदरवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचे देसाई यांनी सांगितले.

पहिल्या ३ कि. मी. साठी पूर्वीप्रमाणेच ५ रु. एवढे तिकीट असेल. तर ४-९ कि. मी. साठी आता ६० पैशांऐवजी ७० पैसे तर १० कि. मी. व त्यावरील प्रवासासाठी कि. मी. मागे ५५ पैशांऐवजी ६० पैसे आकारण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

बस तिकीट दर

पूर्वीचे दर नवे दर

पहिले ३ कि. मी. ५ रुपये ५ रुपये

४ ते ९ कि. मी. ६० पैसे ७० पैसे

प्रति किलोफीटर प्रति किलोफीटर

१० कि. मी. व ५५ पैसे ६० पैसे

त्यावरील प्रति किलोफीटर प्रति किलोफीटर