Home बातम्या सोनिया गांधींची आज सभा

सोनिया गांधींची आज सभा

0

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या कांपाल येथील जाहीर सभेची तयारी पूर्ण झाली असून संध्याकाळी ५.१५ वाजता त्यांचे केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांच्यासमवेत कांपाल मैदानावर आगमन होईल. ५.२० वाजता त्यांच्या हस्ते ४ स्वातंत्र्य सैनिकांचा व २ नामवंत महिला समाज सेविकांचा सत्कार होईल. ५.३५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ५.४५ वाजता प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांचे तर ५.५५ वाजता मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे भाषण झाल्यानंतर ६.५ वाजता सोनिया गांधी भाषण करतील.

६.३५ वाजता त्या येथून दाबोळी विमानतळावर निघतील. गांधी व अँथनी यांच्या गोवा भेटीसाठी कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी ठेवली आहे. गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांचा तोफा यापूर्वीच गोव्यात दाखल झाला आहे. बुलेट प्रुफ कारही दाखल झाली आहे.