विशेष आर्थिक विभागासंदर्भात जमीन घोटाळा झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी तीन राजकारण्यांविरुद्ध पोलीस प्रमुखांकडे काल रीतसर तक्रार नोंदवली. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी उद्योगमंत्री लुईझिन फालेरो तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांच्यावर पर्रीकर यांनी या तक्रारीत गंभीर आरोप केले असून त्यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस प्रमुख आदित्य आर्या यांनी त्यांना दिले आहे.