Home बातम्या सफाई कामगारांचीस्थिती समाधानकारक

सफाई कामगारांचीस्थिती समाधानकारक

0

सफाईसाठी कर्मचारी गोव्यात यंत्रांचा वापर करीत असल्याची माहिती काल समाजकल्याण अन्य संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य के. बी. कृष्णमूर्ती यांना दिली. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

येथील सफाई कर्मचार्‍यांच्या जीवनमानाची तपासणी करण्याच्या हेतूने कृष्णमूर्ती गोव्यात आले आहेत. त्यांनी काल सचिवालयातील परिषदगृहात नगरविकास सचिव बी. विजयन, पोलीस सरसंचालक, पंचायत संचालक, मिनीन डिसोझा, पालिका प्रशासकीय संचालक, संदीप जॅकीस तसेच वेगवेगळ्या पालिकांचे मुख्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.