Home बातम्या शिर्डीच्या ‘प्रसादा’ला आयएसओ प्रमाणपत्र

शिर्डीच्या ‘प्रसादा’ला आयएसओ प्रमाणपत्र

0

साईबाबा मंदिरातील प्रसिद्ध प्रसादालयाला अन्न सुरक्षेसाठीचे आयएसओ २२०००-२००५ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. साईबाबांच्या ९५व्या पुण्यतिथीला हे प्रमाणपत्र ट्रस्टचे चेअरमन सत्र न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

प्रसादालयाकडून प्रत्येक भाविकाला विनाशुल्क लाडूंचे एक पाकिट प्रसाद म्हणून दिले जाते. सुमारे २५ हजार भाविक दर दिवशी याठिकाणी दर्शनाला येत असतात. प्रसादालयामार्फत भाविकांना माफक दरात जेवणाची सोयही केली जाते. अन्न सुरक्षा व अन्न दर्जासाठी हे प्रमाणपत्र दिले जाते.