पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी काल सकाळी पणजी महापालिकेला भेट देऊन महापालिकेने सुरू केलेल्या कचरा कम्पोस्टिंग केंद्राची तसेच कचर्याचे कसे वर्गीकरण केले जाते त्याची पाहणी केली.
नंतर महापालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो, आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांच्याशी बोलताना त्यानी वरील कामाची प्रशंसा केली. नंतर महापालिका अभियंत्याशीही त्यानी चर्चा केली. जवाहरलाल शहर विकास योजनेखाली पुणे महापालिका कोणती विकासकामे करीत आहे त्याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. वरील योजनेखाली पुणे महापालिकेने शहरात जलद बससेवा कशी सुरू केली त्याचीही माहिती त्यांनी दिली व पणजी शहरात हीच योजना कशी राबवणे शक्य आहे त्याविषयीही त्यांनी महापौर, आयुक्त व महापालिका अभियंत्यांना मार्गदर्शन केले. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या बसेस् आणाव्या लागतील, बस थांब्यांची कशी व्यवस्था करावी लागेल हे सांगतानाच ऑटोमेटिक तिकिटांविषयीही माहिती दिली. दरम्यान, जलद सीटीबस सेवेसाठी महापालिका मंडळाला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे आयुक्त संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले.