Home बातम्या वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

0

तेलंगणा आंदोलनामुळे आज रामगुंडम वीज निर्मिती प्रकल्प बंद झाल्यास त्याचा गोव्याच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकेल. तसे झाल्यास ४५ मॅगावॅट विजेची टंचाई निर्माण होईल. या समस्येवर पर्यायी व्यवस्था करण्याची सरकारने तयारी ठेवल्याचे वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

पूर व वादळामुळे कोर्बा प्रकल्प बंद ठेवल्याने त्याचाही येथील पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळेच गेले पंधरा दिवस वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे वीजमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गोव्याला मिळत असलेल्या ४०० मॅगावॅट विजेपैकी पश्‍चिम वीज महामंडळातून २९८ मॅगावॅट वीज मिळत आहे तर रामगुंडममधून १०० मॅगावॅट, कावसगंगा ४४ मॅगावॅट रिलायन्स कडून १६ तर जीएस पीएलकडून २ मॅगावॅट वीज मिळत असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

थिवी येथील ट्रान्सफॉरमरमध्ये बिघाड झाल्याने त्याचाही पुरवठ्यावर परिणाम होत आहे.