Home बातम्या नव्या जुवारी पुलाची गरज : वीजमंत्री सिक्वेरा

नव्या जुवारी पुलाची गरज : वीजमंत्री सिक्वेरा

0

राष्ट्रीय महामार्ग १७ वरील जुवारी पूल कमकुवत झाला आहे त्यामुळे ताबडतोब नवा पूल उभारण्याची गरज आहे. सरकारने गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे एन्सुईटीया योजनेखाली जमीन ताब्यात घेवून पूल उभारण्याचे काम करावे, अशी मागणी वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी काल केली.

वरील मार्गाच्या रूंदीकरणाचे काम रोखण्यास आपण जबाबदार आहे, हा साबांखामंत्री चर्चिल आलेमांव यांचा आरोप खरा आहे. महिन्याकाठी ३००० रुपये टोल कुणालाही परवडणारा नाही. त्यामुळेच आपण टोल कमी करण्याची आपण मागणी केली होती. परंतु राष्ट्रीय रस्ता प्राधिकरणाला ते शक्य झालेले नाही.

त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अडून राहिले आहे, असे ते म्हणाले. या कारणासाठी जुवारी पुलाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन वीजमंत्र्यानी केले आहे.