Home बातम्या विष्णू वाघ यांच्या म्हणण्यात तथ्य नाही : पर्रीकर

विष्णू वाघ यांच्या म्हणण्यात तथ्य नाही : पर्रीकर

0
वैयक्तिक भीती पक्ष किंवा सरकार दूर करू शकत नाही. असे सांगून सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांच्या प्रश्‍नावर सांगितले. वाघ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आपण त्यांची चार वेळा भेट घेतली होती.

त्यामुळे सरकारने दखल घेतली नाही या त्यांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे पर्रीकर म्हणाले. पोलिसांनी कारवाई सुरू केली नसती तर संशयित अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेलेच नसते, असेही पर्रीकर यांनी सांगितले.