विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत आज दिल्लीत चर्चेची शक्यता

0
11

गोव्याच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी आज सोमवारी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना व्यक्त केली. विरोधी पक्ष नेत्याची आज सोमवारी दिल्लीतच निवड होणार आहे का असे विचारले असता ते म्हणाले की आज दिल्लीत त्याबाबत चर्चा होणार आहे. मात्र, विरोधी पक्षनेत्याची तेथे आज निवड होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वआमदारांनाच मिळून नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. हल्लीच कॉंग्रेस पक्षातील आमदारांच्या एका गटाने पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पक्षाचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह पक्षातून कुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून काढून टाकले होते.