Home Featured मुख्यमंत्री आजपासून दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री आजपासून दिल्ली दौऱ्यावर

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवार दि. 27 आणि रविवार दि. 28 जुलै रोजी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असतील. दिल्लीत भाजपने आयोजित केलेल्या ‘मुख्यमंत्री परिषदे’त ते सहभागी होणार आहेत. तसेच नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहाणार आहेत.
देशभरातील भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री या परिषदेला हजर राहून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. यावेळी पक्षाकडून त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. याशिवाय डॉ. प्रमोद सावंत हे नीती आयोगाच्या बैठकीलाही हजर राहाणार आहेत, त्या दृष्टीनेही त्यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यामुळे शनिवारी व रविवारी मुख्यमंत्री नागरिकांना भेटू शकणार नाहीत. या दोन दिवसांत गोवा विधानसभा अधिवेशनाचेही कामकाज होणार नाहीत. सोमवारी मुख्यमंत्री गोव्यात परतणार असून, ते अधिवेशनाला हजर राहतील.