सरकारसमोर पेच
व्यापारी वाहनांना गोव्यात प्रवेश करण्यासाठी चेक नाक्यांवर व्यापारी कर लागू करण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे कायदा खात्याने सरकारला कळविले असून त्यामुळे वाहनांना व्यापारी कर लागू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाची सध्यातरी अंमलबजावणी करणे अशक्य झाले आहे.
गोव्या बाहेरून राज्यात मोठ्या प्रमाणात माल घेऊन वाहने येतात. महसूल गोळा करण्याच्या हेतूने सरकारने या वाहनांना प्रवेश कर लागू करण्याचे ठरविले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वरील प्रस्ताव होता. कॉंग्रेस सरकारच्या काळातही तसा प्रयत्न झाला होता. विद्यमान सरकारने या प्रस्तावाची कार्यवाही करण्याचे ठरविल्याने त्यावर अभ्यास करण्यासाठी कायदा खात्याकडे फाईल पाठविली होती.
कायदा खात्याने त्यावर अभ्यास करून कायद्यात तशी तरतूद नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे सरकारला त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल.
व्यापारी वाहनाना वरील कर लागू केल्यास राज्याला बर्याच प्रमाणात महसूल मिळू शकेल.