Home बातम्या वाळपईतील शासकीय प्रकल्पांचे १४ रोजी उद्घाटन

वाळपईतील शासकीय प्रकल्पांचे १४ रोजी उद्घाटन

0
साधन सुविधा विकास महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत वाळपई इस्पितळ, बस स्थानक, बाजार प्रकल्प यांचे येत्या दि. १४ रोजी उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने राज्यात ५ उड्डाण पूल उभारण्याचाही निर्णय घेतला आहे.

या पुलांच्या बांधकामांसाठी व मांडवीवर उभारण्यात येणार्‍या समांतर पुलाच्या कामाचे सल्लागार म्हणून एस. एन. भोबे यांची नियुक्ती केली आहे. चिखली ते विमानतळ दरम्यान ग्रेड सेपरेटर उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.