जनलोकपाल विधेयकासंबंधी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग व सॉलिसिटर जनरल यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारातील माहिती फुटल्याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने काल केली. नायब राज्यपाल कॉंग्रेसचे एजंट असल्यासारखे वावरत असल्याचा खळबळजनक आरोपही आपने केला. ना. राज्यपाल आप ची प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दामहून असे वागत असल्याचा आरोपही करण्यात आला.
राज्यपाल व सॉलिसिटर जनरल यांच्यातील पत्रांमधील माहिती फुटतेच कशी, त्याची चौकशी ताबडतोब केली जावी, अशी मागणी पक्ष प्रवक्ते आशुतोष यांनी केली. विधानसभेच्या अगदी पहिल्या दिवसापासून ‘आप’ नायब राज्यपालांशी एवढे चांगले वागत आहे, मात्र राज्यपालांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.