Home बातम्या लेखिका कस्तुरी देसाई यांचे निधन

लेखिका कस्तुरी देसाई यांचे निधन

0

लेखिका, संशोधक आणि पर्यावरण कार्यकर्त्या डॉ. कस्तुरी देसाई (५५) यांचे अल्पआजाराने काल बेळगाव येथे इस्पितळात निधन झाले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. नारायण देसाई यांच्या त्या पत्नी होत.

आज सकाळी ११ पर्यंत त्यांचे पार्थिव नागेशी फोंडा येथील निवासस्थानी आणले जाणार असून अंत्यदर्शनानंतर त्यांच्या इच्छेनुसार शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयास देह दान करण्यात येणार आहे. मूळ कोलकाता येथील श्रीमती कस्तुरी यांचा नारायण देसाई यांच्याशी विवाह झाला होता. त्या पीईएस महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. महाश्वेता देवी यांच्या ‘अरण्येर अधिकार’ या बंगाली कादंबरीच्या कोकणी अनुवादासाठी श्रीमती देसाई यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्‍चात पती नारायण तसेच विवाहित कन्या अपूर्वा असा परिवार आहे.