रितेश पटेल आत्महत्या; दोन महिलांना अटक

0
30

पणजी पोलिसांनी गुजरात येथील रितेश पटेल याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुजरातमधील दोघा महिलांना काल अटक केली.
रितेश पटेल याचा मृतदेह मांडवी नदीच्या पात्रात आढळून आला होता. या प्रकरणी मयत रितेश पटेल याचा बंधू यश पटेल याने दोन महिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पणजी पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये नाझनीनाख्तर सय्यद (27, अहमदाबाद) आणि झोयाजाबीन सैय्यद (20, अहमदाबाद) या दोघांना काल 6 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी रितेश पटेल याला संशयित दोन्ही महिला गोव्यात घेऊन आल्या. रायबंदर येथील एका हॉटेलमध्ये त्याच्याशी वादावादी करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे.