दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी मार्कुस डिसिल्वा हेही इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुळे पॅनलमधील दत्ता भट व उमेश शिरोडकर यांनी सुभाष फळदेसाई पॅनलला पाठिंबा दिलेला असला तरी त्यांची अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपदी वर्णी लागणे शक्य नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यासाठी सात दिवसांची नोटीस देणे बंधनकारक असल्याने वरील निवडणूक पुढील आठवड्यातच होऊ शकत असल्याचे कळते.
मुळे यांचे मौन
पनलमधील दोघे फुटून जाऊन विरोधी गटाला मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुळे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.