Home बातम्या २०१४ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी-मोदी थेट लढत

२०१४ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी-मोदी थेट लढत

0

परवा त्यांनी मुलायम सिंग यांच्यावर टीका करताना ते पंतप्रधान होण्याची स्वप्न रंगवत असल्याचे म्हटले होते. काल त्यांनी सांगितले की, समाजवादी पार्टीसारख्या पक्षांना अखिल भारतीय अस्तित्व नसल्याने ते केंद्रात सरकार बनवू शकत नाही.

येणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतरचे सरकार एकतर कॉंग्रेसचे असेल किंवा नरेंद्र मोदी यांचे असे त्यांनी जाहीर करून टाकले. इतर पक्ष उगाच लोकांची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी आमचे उमेदवार असले तर मग गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारखा सभ्य माणूस सापडणे कठीण असल्याचे सांगताना राहुल गांधींना त्यांच्या आशिर्वादानेच पंतप्रधान बनावे लागेल असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी पंतप्रधान बनावेत अशी आपलीही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद यांचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री म्हणतात महागाईमुळे फायदाच

केंद्रीय पोलाद मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी सोमवारी आपण महागाईवर खूष असून त्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा झाल्याचे विधान करून विरोधकांची तीव्र टीका ओढवून घेतली. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी सरकार शेतकर्‍यांप्रती असंवेदनशील बनल्याचा आरोप करून ‘महागाई माफिया’चा भाग असल्याचे म्हटले.

उत्तर प्रदेश येथे रविवारी एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना महागाईसंबंधी प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी वरील विधान केले. दरवाढ होत आहे तसतसा शेतकर्‍यांना लाभ वाढतोय. दाळ, आटा आणि भाज्या महागल्या त्यामुळे आपण अत्यंत आनंदी आहे. जेवढी महागाई तेवढा शेतकर्‍यांना फायदा अधिक असे ते म्हणाले.

त्यांच्या या विधानावर लगेच भाजप व जनता दल – संयुक्तने तीव्र टीका केली.

भाजप नेते शहानवाज हुसेन म्हणाले, सरकार आम आदमीचे असल्याचे सांगत आहे मात्र प्रत्यक्षात सरकार लोकांपासून दूर जात आहे. अरुण जेटली म्हणाले की, महागाईने शेतकर्‍यांची जी दुर्दशा झाली आहे त्याची माहितीच मंत्र्यांना नाही असे वाटते.

दरम्यान, कायदा मंत्री सल्मान खुर्शिद यांनी सारवासारव करताना सांगितले की, शेतकर्‍यांना जर त्यांच्या वस्तूंवर जास्त किंमत मिळत असेल तर बाजारातही किंमती निश्‍चितच वाढतील.

आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देताना श्री. प्रसाद म्हणाले की, आपण म्हटले होते की शेतकर्‍यांच्या उत्पादनांच्या किमती वाढतात तेव्हा आनंद होतो. बटाटा, टॉमेटो व इतर भाज्या महागल्या की लगेच मोठा विषय बनतो. मात्र सिमेंट, पोलाद, कपडे महागले तर मोठा विषय होत नाही. शिक्षणाच्या शुल्कात होणार्‍या भरमसाठ वाढीमुळे शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण बनत आहे, मात्र त्याविषयी कोणी बोलल्याचे दिसत नाही, असे मंत्री म्हणाले.