आपल्या पगावाढीच्या मागणीकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ काल गोवा राज्य सहकारी बँकेच्या साठ कर्मचार्यांनी येथील कदंब बस स्थानकाजवळील क्रांती सर्कलवर धरणे धरले. संध्याकाळी ४ ते ५.३० या दरम्यान हे धरणे धरण्यात आले.
कामगार नेते सुभाष नाईक जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे धरण्यात आले. व्यवस्थापनाने पगारवाढीची मागणी पूर्ण न केल्यास सर्व शाखांजवळ धरणे धरण्याचा तसेच संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.