Home बातम्या म्हापशात अपघातात स्कूटरस्वार ठार

म्हापशात अपघातात स्कूटरस्वार ठार

0

गावसावाडा-म्हापसा येथील प्रिती इंटरनॅशनल हॉटेल जवळ आज सकाळी ८.५० वा. अचानक आडवा आलेल्या डुक्करावर स्कूटरने धडक दिल्याने चालक रामकृष्ण शिरोडकर आकय-करासवाडा हा रस्त्यावर पडून गंभीर झाल्याने जागीच ठार झाला.

रामकृष्ण म्हापसा बाजारातून आपल्या आकय येथील घरी जात असताना गावसावाडा येथील प्रिती इन्टरनॅशनलजवळ पोहोचताच रस्त्यावर अचानक डुकर आडवा आला. त्याला त्यांच्या स्कूटरची धडक बसली. त्यावर स्कूटरचालक शिरोडकर हे रस्त्यावर स्कूटरसहीत पडले व गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

म्हापसा पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच हवालदार रामा रेडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह तपासणीसाठी पाठविला व नंतर नातेवाईकांच्या हवाली केला.

अपघातास कारणीभूत टेम्पो चालकास अटक

दरम्यान, करासवाडा जंक्शनवर परवा दि. १२ रोजी मोटरसायकल व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातातील टेम्पो चालक दर्शन पंढरी हळदणकर, पोरस्कडे-पेडणे याला म्हापसा पोलिसांनी काल अटक केली. काल संध्याकाळी ७.१५ वा. सुमारास रेतीवाहू टेम्पोने इन्सुली (महाराष्ट्र) येथे जाणार्‍या एका मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मेघा देसाई (२३) व तिचा दीड वर्षांचा पूत्र साईराज देसाई जागीच ठार झाले होते. या अपघातास कारणीभूत ठरल्यावरील टेम्पो चालकास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.