Home बातम्या मोर्ले येथे बसला अपघात

मोर्ले येथे बसला अपघात

0

पर्ये सत्तरी येथे बस आणि खडीवाहू ट्रक यांच्या अपघात होऊन तीन बसप्रवासी जखमी झाले.

काल सकाळी ७.५० वा. विर्डी दोडामार्ग येथून होंडा येथे कंपनीच्या कर्मचार्‍यांना घेऊन बस जात असताना पर्ये येथील वळणावर समोरून येणार्‍या भरधाव वेगातील ट्रकाची धडक बसला बसली.

यात बसचालक त्रिमुर्ती मयेकर (होंडा), तसेच प्रवासी मेघा चौकुळकर (विर्डी), सुषमा घाडी (विर्डी) हे जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिका बोलावून तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. केरी सत्तरी पोलीस आऊटपोस्टचे हवालदार सुरेश गावस यांनी पंचनामा केला.