Home बातम्या मोती डोंगरावरील आणखी घरे पाडली

मोती डोंगरावरील आणखी घरे पाडली

0

मोतीडोंगर म्हणजे बेकायदेशीर बांधकामे व गुन्हेगाराचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध आहे. बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली असून काल मोती डोंगरावरील कोमुनिदादीच्या जागेत बांधलेली ११ घरे पाडण्यात आली. गेल्या दोन दिवसांमागे दोन घरे मोडली होती. आजपर्यंत मोडलेल्या घरांची संख्या १३ झाली आहे.

कोमुनिदादीच्या प्रशासकांनी बेकायदेशीर घरांचे सर्वेक्षण केले होते. जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यांनी आदेश देताच काल संयुक्त मामलेदार त्रिवेणी वेळीप यांनी बांधकाम खाते व पालिकेच्या कामगारांना घेऊन पोलीस संरक्षणात ती बांधकामे मोडली. पणजीहून खास राखीव दलाचे पोलीस आणले होते. लवकरच आणखी काही घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.