Home बातम्या मैत्री करून दागिने लुटले

मैत्री करून दागिने लुटले

0

एका अज्ञात युवतीने किटला-हळदोणा येथील सुरेखा नाईक या महिलेशी मैत्री करून तिचे दीड लाख रुपये किंमतीचे अंगावरील दागिने हातोहात पळविल्याचा प्रकार काल म्हापशात घडला. याप्रकरणी म्हापसा पोलिसात अज्ञात युवतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला काल सडये-शिवोली येथील एका आध्यात्मिक गुरुच्या दर्शनाला गेली होती. तेथून संध्याकाळी ५ वाजता ती म्हापसा बाजारात आली. बाजारात तिला २० ते २५ वर्षाची एक युवती भेटली. तिने फिर्यादी मैत्री केली. नंतर तिला घेऊन ती श्री बोडगेश्‍वर मंदिरात गेली.

वाटेत त्या युवतीने तिला कसले तरी पेय दिले.

देवदर्शन घेतल्यानंतर दोघीजणी कदंब बसस्थानकावर आल्या. फिर्यादी बसमध्ये बसून घरी परतली संध्याकाळी ५ ते ७ असे दोन तास ती युवती फिर्यादी बरोबर होती. फिर्यादी महिला रात्री ८ वाजता घरी परतली. तिने रात्रीचे जेवण घेतले त्यानंतर आपल्या अंगावरल सोन्याची पाटली जोड, अंगठी व मंगळसूत्र चोरीला गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यावर त्याच रात्री १२.३० वाजता म्हापसा पोलिसस्थानकावर येऊन सुरेखा नाईक हिने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करीत आहेत.