Home बातम्या महानंद नाईकला दुसरी जन्मठेप

महानंद नाईकला दुसरी जन्मठेप

0

सिरीअल किलर महानंद नाईक याला काल जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची जन्मठेपेची सजा सुनावली. याशिवाय त्याला ५० हजार रु. दंडही सुनावण्यात आला असून तो न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास सांगितला आहे.

योगिता ऊर्फ बालिका नाईक खून प्रकरणात दोषी ठरवून त्याला ही जन्मठेप सुनावण्यात आली आहे. ही त्याला देण्यात आलेली दुसरी जन्मठेप आहे.

नागझर-कुर्टी येथील योगिताचा मृतहेद वाळपई पोलिसांना मोर्ले येथील काजू बागायतीत सडलेल्या अवस्थेत २००९ साली सापडला होता. लग्नाचे आमिष दाखवून महानंदने तिचा गळा आवळून खून केल्याचे व दागिने लुटल्याने नंतर उघडकीस आले होते.