Home बातम्या मंत्री दीपक ढवळीकरांकडून नरेश सावळांना मंत्रिपदाची हमी

मंत्री दीपक ढवळीकरांकडून नरेश सावळांना मंत्रिपदाची हमी

0

डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी नानोडा येथे भव्य भाऊबीज महिला संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांची मोठी गर्दी लोटली होती. सौ. अरुणा वाघ यांनी आपल्या भाषणात नरेश सावळ यांना मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केल्यानंतर प्रमुख पाहुणे म. गो. अध्यक्ष ढवळीकर यांनी सावळांनी म. गो. पक्षात यावे.

आम्ही सन्मानाने त्यांना मंत्रिपद निश्‍चितपणे देण्याची हमी देत असल्याचे सांगून सावळ यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. म.गो. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सावळांचे कर्तृत्व, नेतृत्व व कार्य करण्याची क्षमता कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांनी मगोत प्रवेश करावा, अशी आग्रही मागणीवजा सूचना मंत्री ढवळीकरांनी केल्याने आगामी काळात राजकीय पातळीवर नवी समीकरणे पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नरेश सावळ हे म. गो. शी जवळीक साधून असून ढवळीकर बंधू त्यांना सर्व प्रकारचे सहकार्यही करीत आहेत. तसेच त्यांच्या सार्‍या कार्यक्रमांना ढवळीकर बंधू नियमित उपस्थिती लावत असतात.