Home बातम्या बाळ्ळीत ‘उटा’ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

बाळ्ळीत ‘उटा’ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

0

बाळ्ळी वंटे येथील दीपक फळदेसाई हा या जळीतकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. ‘उटाचे काही कार्यकर्ते आंचलया इमारतीत दडून बसले असता इमारतीला आग लावून आत लपून बसलेल्यांना बाहेर येण्यास अटकाव करून त्यांच्या हत्या केल्याचा दीपक फळदेसाई व अन्य १४ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे.

उटाच्या कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी बाळ्ळी येथे राष्ट्रीय महामार्ग १७वर धरणे धरून रहदारी अडवून धरली होती व नंतर तेथे वाहनांना आग लावली होती. त्यानंतर वन खात्याची कचेरी व स्थानिक लोकांवर हल्ला झाला होता. त्यानंतर जळीतकांड घडले होते. या जळीतकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक फळदेसाई हा गेले अडीच महिने कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांची सुटका होऊ शकलेली नाही. काही स्थानिक वाहिन्यांनी केलेल्या चित्रिकरणाच्या आधारे गुन्हा अन्वेषण पोलिसांना यासंबंधीचे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. त्याच आधारावर दीपक फळदेसाई याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रशांत फळदेसाई हा दुसरा आरोपी अद्याप बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पैंगीण मतदारसंघाचे आमदार रमेश तवडकर व माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्यावरही यावेळी हल्ला झाला होता.