Home बातम्या बस मालकांना तूर्त भाडेवाढ नको

बस मालकांना तूर्त भाडेवाढ नको

0

डिझेल दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर बस मालकांची बैठक घेऊन त्यांना वरील वाढीचा कशा प्रकारे परिणाम होत आहे, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सर्व बस मालकांकडून अहवाल येईपर्यंत प्रवाशांना वेठीस न धरण्याचे ठरविले आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितले.

यापूर्वी वाहतूक खात्यानेच बस मालकांवर भाडेवाढ लादली होती. परंतु खाजगी बस मालकांनी त्यास विशेष प्रतिसाद दिला नाही, असे त्यांनी सांगितले. बस मालकांच्या सरकार दरबारी अनेक मागण्या आहेत. परंतु सरकारने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असे ते म्हणाले. डिझेल दरवाढीचे आपण समर्थन करीत आहात काय, असा प्रश्‍न विचारला असता केंद्राने आवश्यकतेनुसार वरील निर्णय घेतला असावा त्यामुळे आपण समर्थनही करीत नाही व विरोधही करीत नाही, असे ताम्हणकर यांनी सांगितले.

गोव्यात सध्या माहिती हक्क कायदा नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब माहिती आयुक्ताची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.