Home बातम्या म्हापसा खूनप्रकरणी ४० जणांची चौकशी

म्हापसा खूनप्रकरणी ४० जणांची चौकशी

0

म्हापसा येथील या घटनेत कामाक्षी ज्वेलर्सचे मालक रत्ना रायकर यांची हत्या करून चोरट्यानी सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने पळवले आहेत.

दरम्यान, कामाक्षी ज्वेलर्स दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती. काल पोलिसांनी सुमारे ४० जणांची चौकशी केली. यात काही कारागिरांचा समावेश होता.

काल सकाळी पोलीस महासंचालक किशन कुमार, उपमहानिरीक्षक संजयसिंग, अधीक्षक ऍलन डिसा, शेखर प्रभूदेसाई, गुन्हा अन्वेषणाचे मिश्रा, विजयसिंग, उपअधीक्षक सेराफिन डायस, निळू राऊत देसाई, निरीक्षक तुषार वेर्णेकर, राहुल परब, सी. एल. पाटील, सुनीता सावंत इत्यादींनी दुकानाला भेट देऊन धागेदोरे शोधण्याच्यादृष्टीने विचारविनियम केला.

काल रविवार असल्याने दुकानातील सर्वच दागिने आत असलेल्या तिजोरीत ठेवण्यात आले होते. दुपारी एक ते अडीच दरम्यान हत्या व चोरीचा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दुकानात मयत रायकर यांची चोरट्यांशी झटापट झाली असावी असा निष्कर्षही पोलिसांनी काढला आहे. शवचिकीत्सेनंतर काल संध्याकाळी बांबोळी येथील गोमेकोमधून रत्ना रायकर यांचा मृतदेह त्यांच्या डांगी कॉलनी येथील निवास्थानी आणण्यात आला. शेकडो नागरिक यावेळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.