Home Featured फॉर्म 7′ चा गैरवापर; गोवा फॉरवर्डचा आरोप

फॉर्म 7′ चा गैरवापर; गोवा फॉरवर्डचा आरोप

0

गोवा फॉरवर्डच्या एका शिष्टमंडळाने आल्तिनो पणजी येथे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची काल भेट घेतली आणि फॉर्म 7 या हरकतीच्या सुविधेचा गैरवापर करून मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जात असल्याची तक्रार केली. काणकोण मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्यासाठी सुमारे 300 हरकती सादर केल्या आहेत. या हरकतीमुळे मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसआयआरच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.