Home बातम्या प्रभावी लोकपालसाठी सरकार वचनबद्ध

प्रभावी लोकपालसाठी सरकार वचनबद्ध

0

लोकपाल विधेयक संमत न झाल्याने हिसार लोकसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसला पराभूत करावे असे आवाहन अण्णांनी लोकांना केले आहे. अण्णांनी २१ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांना पत्र लिहून लोकपाल, निवडणूक सुधारणा आणि स्थानिक स्वराज संस्थांचे बळकटीकरण अशा मुद्दांवर चर्चा केली होती. त्यास उत्तर म्हणून पंतप्रधानांनी हे पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान म्हणतात, सरकार प्रभावी लोकपाल विधेयकासाठी वचनबद्ध आहे. या विधेयकाबरोबरच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासकीय सुधारांकरिता विचार सुरू आहे. उमेदवार नाकारण्याच्या तरतुदीसाठी भारतासारख्या लोकशाही व्यवस्थेत राजकीय एकमत आवश्यक आहे. निवडणूक सुधारांसाठी अनेक प्रस्ताव विचाराधीन आहेत त्यात उमेदवार नाकारण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.