Home बातम्या खनिज वाहतूकदार, बार्ज मालकांचा कडकडीत बंद

खनिज वाहतूकदार, बार्ज मालकांचा कडकडीत बंद

0

ट्रक मालक आज राजधानीत येऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत. खाणींवर निर्बंध आणल्यास राज्यातील सुमारे अडीच लाख लोकांवर उपासमारीची पाळी येईल व हजारो जणांना बेरोजगार व्हावे लागेल, असे खाण ट्रक मालकांचे म्हणणे आहे. आपले हे म्हणणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी तसेच खाणींवर निर्बंध घातले जाऊ नयेत या मागणीसाठी आजचे शक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

राज्यातील शेकडो खाण ट्रक मालक आजच्या या शक्ती प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. महिनाभरापूर्वी राज्यातील बेकायदा खाणींसंबंधी सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती शहा हे गोव्यात आले असता खाण ट्रक मालकांनी त्यांना सुनावणी घेऊ न देता राज्यातील कायदेशीर व बेकायदेशीर खाणी चालूच ठेवाव्यात व त्या बंद केल्यास खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असा इशारा त्यांना दिला होता.

एका बाजूने खाण व्यवसायात असलेले लोक खाणी चालूच ठेवाव्यात अशी मागणी करीत असताना पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी लोकांची मात्र खाणीवर सरकारने वेळीच नियंत्रण आणावे अशी मागणी आहे. अन्यथा गोव्याला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.