Home बातम्या पोलिसांवरील हल्लाप्रकरणी तिघांना शिताफीने अटक

पोलिसांवरील हल्लाप्रकरणी तिघांना शिताफीने अटक

0

उसप येथे काल पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी काल डिचोली पोलिसांनी धडक कारवाई करताना सायंकाळी पाचच्या दरम्यान पोलीस कुमक नेऊन तिघाजणांना शिताफीने अटक केली असून गावात सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा पोहचताच तेथे पळापळी सुरू आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिला.

परवाच्या घटनेने पोलीस यंत्रणा सतर्क झाली व त्यांनी आय. आर. बी. ची खास टीम, दोन पोलीस उपनिरीक्षकासह सुमारे ५० जणांची कुमक घेऊन उसप गावात प्रवेश केला व तिघांना अटक केली.

याप्रकरणी आणखी काहींना अटक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. निरीक्षक निनाद देऊलकर यांनी कायदा हातात घेणार्‍या व कोणतेही कारण नसताना पोलिसांवर हल्ला करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले.