Home बातम्या वारखंड येथे काजू बागायतीस आग; ५ लाखांचे नुकसान

वारखंड येथे काजू बागायतीस आग; ५ लाखांचे नुकसान

0

तुळस्करवाडी-वारखंड-पेडणे येथील काजू बागायतीला आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली.

आगीच्या वणव्यात काजूच्या झाडाबरोबर फणस, जांभळ, सागवान आदि झाडेही जळून गेली. उपजिविकेचेच साधक नष्ट झाल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

काजूचा हंगाम संपत आल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून नेहमी प्रमाणे काजू बागायतीत या शेतकर्‍यांनी जाणे बंद केले. अन्यथा या शेतकर्‍यांना काजू बागायतीला आग लागल्याने निदर्शनास येऊन आग लगेच विझविणे शक्य झाले असते.